रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच; ड्रोन हल्ल्यात सात ठार

युद्धविरामाच्या चर्चेपूर्वी रशियाने आज पुन्हा एकदा युक्रेनवर ड्रोन हल्ला करून सात जणांना ठार केले. सौदी अरेबियामध्ये होणाऱया युद्धविरामाच्या अपेक्षित बैठकीपूर्वी रशियाने युक्रेनच्या राजधानीला लक्ष्य केले. रशियाने संपूर्ण युक्रेनमध्ये 147 ड्रोन डागले. त्यापैकी 97 ड्रोन पाडण्यात युव्रेनला यश आले. इतर 25 ड्रोनचा प्रतिकार करता न आल्याने युक्रेनच्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले. खाकाaव्ह, सुमी, चेर्निहाइव्ह, ओडेसा, डोनेस्तक आणि राजधानी कीव शहरावर रशियाने हल्ले केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठय़ा कालावधीपासून हे युद्ध संपवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मात्र रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अद्याप सुरूच आहे. रविवारी कीव येथे झालेल्या ड्रोन हल्ल्यात पाच वर्षांच्या मुलासह तीन जण ठार झाले आणि 10 जण जखमी झाले. पाच तासांहून अधिक काळ हवाई हल्ले सुरू होते, असे युक्रेनच्या लष्कराने सांगितले.