रशियाने आज युक्रेनवर ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. युक्रेनच्या दक्षिण-पश्चिम शहरांवर ग्लाईड बॉम्ब डागले. या हल्ल्यात सहा युक्रेनी नागरिकांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जखमी झाले आहेत. रशियाने लक्ष्य केलेली युक्रेनची शहरे युद्धक्षेत्राच्या टप्प्यात असलेल्या 1 हजार किमीच्या परिघात आहेत. रशियन हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पाच नागरिकांपैकी बहुतांश दक्षिणेकडील मायकोलायव्ह शहरातील होते. दरम्यान, रशियाने झापोरिझिया शहरावर 3 शक्तिशाली ग्लाईड बॉम्ब डागले. यात एकाचा मृत्यू झाला.