खासगी विमानात बी केअरफुल बॉम्ब आणि रिव्हेंज अशा मजकुराने एकच खळबळ उडाली होती. विमानात तपासणी केल्यावर काही आक्षेपार्ह आढळून आले नाही. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात विमानात बॉम्बच्या अफवेच्या ट्विटच्या घटना घडल्या होत्या. नवीन वर्षातदेखील बॉम्बच्या अफवेच्या घटना घडू लागल्या आहेत. तक्रारदार हे खासगी विमान पंपनीत सुरक्षा व्यवस्थापक म्हणून काम करतात. सोमवारी एक खासगी विमान गोवा येथून मुंबईच्या दिशेने निघाले होते. विमान लॅण्ड होण्यापूर्वी काही वेळअगोदर केबिन क्रूला विमानातील वॉशरूममध्ये एक चिठ्ठी आढळून आली. त्यात बी केअरफुल बॉम्ब तर दुसऱया बाजूला रिव्हेंज असे लिहिले होते.