धर्मावर आधारित आरक्षण मान्य नाही – होसबाळे

धर्माच्या आधारावर आरक्षण स्वीकारार्ह नसून ते संविधानाचे उल्लंघन ठरेल अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी आज मांडली. कर्नाटकात सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना दिलेल्या 4 टक्के आरक्षणाला त्यांनी आक्षेप घेतला. औरंगजेब देशातील लोकांसाठी आदर्श असू शकतो का, असा सवाल होसबाळे यांनी कबरीच्या वादावर केला.