धर्माचे अर्धवट ज्ञान अधर्माकडे नेते. धर्माच्या नावाखाली होणारे अत्याचार चुकीच्या समजुतीतून आणि धर्माचे पूर्ण ज्ञान नसल्यामुळे होतात, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. अर्धवट ज्ञानाने फुगलेल्या माणसाला ब्रह्मदेवही समजावू शकत नाही, असे सुभाषितात म्हटले आहे. अशा लोकांची समजूत काढणे फार जिकिरीचे काम आहे, असेही भागवत यांनी कुणाचाही नामोल्लेख न करता ऐकवले. याला हाकला, याला मारा, याला ठोका, ही वृत्ती योग्य नाही, असे ते म्हणाले.