
मुस्लीमही संघाच्या शाखेत सामील होऊ शकतात, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. न्यूज 18 हिंदी आणि टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, मोहन भागवत हे चार दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. त्यांनी रविवारी सकाळी येथील लाजपत नगर कॉलनी येथे आयोजित शाखेत भाग घेतला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी जातीभेद, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेसह इतर मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी भागवत तेथील स्वयंसेवकांशी संवाद साधत असताना त्यांना विचारण्यात आले की, मुस्लिम देखील शाखेत येऊ शकतात का? यावर भागवत म्हणाले की, शाखांमध्ये सर्व हिंदुस्थानींचे स्वागत आहे.
यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले आहेत की, “मुस्लीमही संघाच्या सामील होऊ शकतात. अट फक्त एवढीच आहे की शाखेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ‘भारत माता की जय’ म्हणण्यास कोणताही संकोच नसावा आणि त्याने भगव्या ध्वजाचा आदर करावा.” ते म्हणाले की, “हिंदुस्थानींच्या धार्मिक पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी त्यांची संस्कृती सारखीच आहे.”