शेअर मार्केटच्या टीप्स देणाऱ्यांना 9.5 कोटींचा दंड

यूटय़ुबवर शेअर मार्केटसंबंधी टिप्स देणाऱया यूटय़ुबर रवींद्र बालू भारती आणि अन्य तीन जणांविरुद्ध सेबीने 9.5 कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. तसेच या सर्वांना 4 एप्रिल 2025 पर्यंत शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. या सर्वांवर यूटय़ुबवर शेअर मार्केटसंबंधी चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप आहे. सेबीने भारती यांच्या कंपनीला शेअर बाजारापासून दूर राहण्यास सांगितले आहे. सोशल मीडियावर भ्रमित आणि गुंतवणूकदारांना चुकीची माहिती पसरवणाऱयांविरुद्ध सेबी कडक कारवाई करणार आहे. भारती यांच्याशिवाय, अन्य तीन जणांमध्ये शुभांगी रवींद्र भारती, राहुल अनंत गोसावी आणि धनश्री चंद्रकांत गिरी यांचा समावेश आहे.