रोटरी क्लबची जुहूत कॅरम स्पर्धा  

रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर आयोजित आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती जुहू, मुंबई यांच्या सहकार्याने पाचवी रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर राज्य मानांकन कॅरम स्पर्धा येत्या 29 ते 31 मार्चदरम्यान विलेपार्लेच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात आयोजित करण्यात येणार आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांत आयोजित केलेली ही स्पर्धा उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने सलग दुसऱ्या वर्षी पुरस्कृत केली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना एपंदर 1 लाख 10 हजारांची रोख पारितोषिके व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी नावे नोंदविण्याची अंतिम तारीख 10 मार्च असून सर्व इच्छुक खेळाडूंनी आपल्या जिल्हा कॅरम संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.