कोहली, शर्मा आणि जडेजा ग्रेड A+ करारांमधून बाहेर पडणार?

sharma kohli jadeja

देशाच्या क्रिकेट नियामक मंडळाने (BCCII) या वर्षी वार्षिक करारांची यादी जाहीर केलेली नाही आणि टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा हे त्यांच्या ग्रेड A+ करारांमधून बाहेर पडू शकतात. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की तिन्ही फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ग्रेड A+ करारांमध्ये प्राधान्य दिले जाते आणि या तिघांनी T20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्याने गुंतागुंत वाढली आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की हे करार सामान्यतः इंडियन प्रीमियर लीग (IPL) आधी जाहीर केले जातात परंतु BCCI ने चॅम्पियन्स ट्रॉफी संपेपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केल्याने तिघेही करारांच्या प्रथम श्रेणीत कायम राहू शकतात. ग्रेड A+ करार असलेला दुसरा एकमेव क्रिकेटपटू वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे परंतु त्याच्या बाबतीत कोणतीही अडचण आता तरी दिसत नाही.

रिपोर्टमध्ये म्हटल्यानुसार, गेल्या वर्षी शिस्तभंगाच्या कारवायांमुळे दुर्लक्षित झाल्यानंतर श्रेयस अय्यरला यावेळी संधी मिळण्याची अपेक्षा आहे. या फलंदाजाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि घरच्या मैदानांवर त्याची कामगिरी निश्चितच उजवी ठरेल.

‘चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहितच्या निर्णयाची बोर्ड वाट पाहिल. जर त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला तर बोर्ड काय करायचे ते पाहेल. जुलैमध्ये त्याने टी-20 वर्ल्डकप जिंकला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्याने चांगले नेतृत्व केले आहे हे कोणीही नाकारू शकत नाही’, अशी माहिती एका सूत्राने दिल्याचे TOI च्या वृत्तात म्हटले आहे.