बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने अत्यंत खराब कामगिरी केली. टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज देखील ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्या समोर ढेपाळले. त्यावरून टीम इंडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
या मालिकेतील रोहित शर्माने तीन कसोटी सामन्यात अवघ्या 31 धावा केल्या तसेच टीम इंडियाने रोहितच्या नेतृत्वात खेळलेले तीनही सामने गमावले. तर जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पर्थमधील एकमेव सामना जिंकला होता. ही मालिका टीम इंडियाने 1-3 च्या फरकाने गमावली. या खराब कामगिरीमुळे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी रोहित शर्मावर टीका केली होती. तसेच कसोटीतील कर्णधारपद अन्य कोणत्या तरी खेळाडूकडे सोपवावे असे देखील ते म्हणाले होते.
सुनील गावस्कर यांनी केलेली टीका रोहितला आवडली नसून त्याने याबाबत बीसीसीआयकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे.