निवृत्त झाला तरी रोहित शर्माच सर्वोत्तम ICC टी20 संघाचा कर्णधार, ‘या’ खेळाडूंचीही झाली निवड

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने T20 World Cup 2024 उंचावत करोडो क्रीडाप्रेमींना वर्षातील सर्वोत्तम गिफ्ट दिले. वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्याने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पंरतु टी20 क्रिकेटमध्ये आणि वर्ल्डकपमध्येही रोहित शर्माचा खेळ दमदार राहिला होता. याचीच दखल घेत ICC ने नुकत्याच जाहीर केलेल्या ICC Men’s T20 Team Of The Year 2024 च्या कर्णधार पदाची धुरा रोहित शर्मावर सोपवली आहे. त्याचबरोबर टीम इंडियाच्या सर्वाधिक चार खेळाडूंची या वर्षातील सर्वोत्तम संघात निवड करण्यात आली आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या संघामध्ये टीम इंडिया व्यितिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, झिम्बाब्वे, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि वेस्टइंडिज या संघातील एका-एका खेळाडूचा समावेश आहे. टीम इंडियाच्या सर्वाधिक चार खेळाडूंचा या संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. या संघाचा कर्णधार रोहित शर्मा असणार आहे. तसेच हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदिप सिंग यांची सुद्दा संघात निवड करण्यात आली आहे. यांच्या व्यतिरिक्त संघामध्ये ट्रेव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), फिल सॉल्ट (इंग्लंड), बाबर आझम (पाकिस्तान), निकोलस पुरन (वेस्ट इंडिज), सिकंदर रझा (झिम्बाब्वे), राशिद खान (अफगाणिस्तान) आणि हसरंगा (श्रीलंका) या खेळाडूंची संघामध्ये वर्णी लागली आहे.