मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीत सध्या अटितटीचा सामना सुरू आहे. चौथ्या दिवशी फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाच्या फलंदाजांनी सुरुवातीला रोखले. मात्र तिसऱ्या स्थानावर आलेल्या लाबुशनेने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. लाबुशनेला वेळेवर बाद केले असते तर ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला ब्रेक लागला असता. मात्रलाबुशनेची विकेट मिळवण्याची अगदी सोपी संधी यशस्वी जैस्वालमुळे टीम इंडियाने गमावली. लाबुशने चाळीस धावांवर असताना यशस्वीने त्याचा अगदी सोपा कॅच सोडला. त्यामुळे रोहीत शर्मा त्याच्यावर वैतागला.
— Drizzyat12Kennyat8 (@45kennyat7PM) December 29, 2024
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात यशस्वीने तीन वेळा कॅच सोडले. अगदी तिसऱ्याच षटकात बुमराहाच्या गोलंदाजीवर यशस्वी जैस्वालने सलामीवीर उस्मान ख्वाजाचा कॅच सोडला. त्यानंतर 40 व्या षटकातील आकाशदीपच्या गोलंदाजीवर यशस्वीनं लाबुशेनची कॅच सोडली. त्यानंतर 49 षटकातही त्याने कमिन्सच्या बाबतीत तीच चूक केली.