तर तेवढ्याच टोकाचा विरोध देखील करू, रोहित पवारांनी नव्या सरकारला दिला इशारा

देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या. तसेच या सरकारला रोहित पवार यांनी इशाराही दिला आहे.

रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस साहेबांचे तर उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल मा.ना.श्री एकनाथ शिंदे साहेब व मा.ना.श्री.अजितदादा यांचे मनपूर्वक अभिनंदन.

 

नवीन सरकार राज्याच्या हिताच्या मुद्द्यांना प्राथमिकता देऊन युवांना रोजगार, औद्योगिक गुंतवणूक, शेतकरी, महिला सुरक्षा या विषयांसाठी चांगले काम करेल हि अपेक्षा आहे.

तसेच विरोधी पक्षात असलो तरी, आमची संख्या कमी असली तरी महाराष्ट्र हिताच्या प्रत्येक निर्णयात राजकीय भूमिका बाजूला ठेवून सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू, परंतु महाराष्ट्र हित डावलणारा कुठला निर्णय घेतला जात असेल तर तेवढ्याच टोकाचा विरोध देखील करू. असा इशारा देत रोहित पवार यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.