मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना कराड गँगने दिलेल्या मरणयातना पाहून अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी या प्रकरणावरून गृहमंत्रालयाला व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांना फटकारले आहे. ”दोन महिन्यापूर्वी फडणवीसांकडे फोटो आले, तुम्हाला झोपा कशा लागल्या? असा संतप्त सवाल रोहीत पवार यांनी केला आहे.
”फोटो पाहून महाराष्ट्र स्तब्ध झाला. कपडे काढतानाचे, छातीवर पाय ठेवून सेल्फी काढले. त्यांनी संतोष देशमुखांवर नाही तर महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेवर लघवी केली असं आपल्याला म्हणावे. हे फोटो काल आपल्याकडे आले पण दोन महिन्यांपूर्वीच देवेंद्र फडणवीस व अजित दादांकडे आले असावे, हे फोटो तुमच्याकडे असताना सुद्धा त्यांना एक धाडसी निर्णय घ्यावा असं वाटत नसेल तर तुम्हाला मन आहे का असा प्रश्न पडलाय. तुमच्याकडे फोटो दोन महिन्यांपूर्वी आले. आम्ही काल पाहिल्यानंतर आम्हाला झोपा लागल्या नाहीत. तुम्हाला दोन महिने झोपा लागता. हे फोटो तुमच्याकडे असताना सुद्धा तुमचं मन तुम्हाला बोललं नाही की माणूसकी जपली पाहिजे. तुम्ही पक्ष जपताय, सरकार जपताय, मैत्री जपताय पण हे फोटो असूनही माणूसकी जपत नाही हे पाहून तुमचे पाय धरायला पाहिजे, अशी टीका रोहीत पवार यांनी केली आहे.
”फडणवीसांना मला विनंती करायची आहे की तुमची मैत्री कचऱ्यात टाका. आजच्या आज धनंजय मुंडे याचा राजीनामा घेतलाच पाहिजे असे आम्हाला वाटतं. कराड हा राक्षसीय प्रवृत्तीचा माणूस धनंजय मुंडेचा खास हे साऱ्या जगाला माहित आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तुम्ही कराडची धनंजय मुंडेंची पाठराखण करत आहात. दादांनी आज अधिवेशन सुरू होण्याआधी राजीनामा घ्यायला पाहिजे. पंकजा मुंडे यांनी देखील पुढे यायला पाहिजे, थोरले मुंडे असते तर धनंजय मुंडे यांना चाबकाने मारायला हवे. आज राजीनामा घेतला नाही तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही. आज राजीनामा घेतला नाही तर या सरकारला महाराष्ट्र माफ करणार नाही. तसंच सर्व कायदेशीर गोष्टींकडे लक्ष देऊन सगळ्या आरोपींना फाशीच झाली पाहिजे हे सरकारने पाहिलं पाहिजे, असे रोहीत पवार म्हणाले.