भर रस्त्यात उघडी-नागडी पडलेली महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था मंत्रालयातील कोटवाल्यांना दिसेल का? रोहित पवार यांचा संतप्त सवाल

लातूरमध्ये एका तरुणाला भररस्त्यात बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला फटकारले आहे. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून त्यांनी महायुती सरकारला सवालही केला आहे.

भर रस्त्यात निपचित उघडी~नागडी पडलेली महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था मंत्रालयातील कोटवाल्यांना दिसेल का? आणि राज्यातील गुन्हेगारीच्या भस्मासुराचा वध होऊन सामान्य माणसाचं जगणं निर्भय होईल का? पोलिसांनी गुन्हेगारांची धिंड काढली, तेवढाच दिलासा…! असे ट्विट रोहीत पवार यांनी केले आहे.