रुपया रसातळाला गेला असून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किमतीत 7 पैशांची घसरण दिसली. या घसरणीसह रुपया 85.11 रुपये प्रतिडॉलरच्या आतापर्यंतच्या सर्वात खालच्या पातळीवर बंद झाला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना खोचक टोला लगावला आहे.
हे वाचा – रुपया रसातळाला; इंधन आणखी भडकणार, डॉलरच्या तुलनेत 7 पैशांची घसरण; महागाई वाढणार
रोहित पवार यांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ‘डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला’. सध्या वृत्तपत्रात अशा बातम्या रोजच दिसतात, पण याला केंद्र सरकार किंवा अर्थमंत्री हे जबाबदार नाहीत. कारण नक्कीच पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती वाढत असल्याने रुपया (₹) वर जाण्याऐवजी खाली घसरत असावा आणि त्यातच GST अधिक असल्याने तो जरा जास्तच वेगाने घसरत असावा..नाहीतरी आजच्या काळात वस्तुस्थिती सांगितली तरी ऐकणार कोण? आणि ऐकणारं असेल तर याकडं लक्ष द्यावं, एवढीच अपेक्षा! असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
‘डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला’
सध्या वृत्तपत्रात अशा बातम्या रोजच दिसतात, पण याला केंद्र सरकार किंवा अर्थमंत्री हे जबाबदार नाहीत..
कारण नक्कीच पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती वाढत असल्याने रुपया (₹) वर जाण्याऐवजी खाली घसरत असावा आणि त्यातच #GST अधिक असल्याने तो जरा जास्तच वेगाने…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 25, 2024