महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रमधुमाळी सुरू असतानाच सोमवारी रात्री पुणे जिल्ह्यातील भोरजवळ खेड शिवापूर टोल नाक्यावर एका गाडीत कोट्यवधी रुपये सापडले. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. पैसे सापडलेली गाडी मिंधे गटातील गद्दार आमदाराची असल्याची चर्चा असून यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही यासंबंधी एक व्हिडीओ शेअर सत्ताधारी पक्षांना झोडपून काढले.
रोहित पवार यांनी मंगळवारी सकाळी पोलिसांनी जप्त केलेल्या पैशांचा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर केला. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25-25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूरच्या डोंगार झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
गद्दार आमदाराकडे जाणारे फक्त 5 कोटी जप्त केले; उरलेले 10 कोटी कुठे गेले? संजय राऊतांचा घणाघात
लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी, महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ok करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं! असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून 25- 25 कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूर च्या #डोंगार_झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत?
लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून… pic.twitter.com/B9Z4gbqRk7
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 22, 2024