लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर अजित पवार यांच्या गटातील 19 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संपका&त असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी आज दिली. पण कोणाला पक्षात प्रवेश द्यायचा याच निर्णय स्वतः शरद पवारच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे पानिपत झाले. या गटाचा एकच खासदार निवडून आला आहे. त्यामुळे अजित पवार गटातील आमदारांमध्ये आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीतील भवितव्याबाबत चिंतेचे वातावरण आहे. परिणामी अस्वस्थ झालेले आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे जाण्याच्या मनस्थितीत असल्याचे वृत्त आहे.
यासंदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, अजित पवारांचे 19 आमदार शरद पवारांच्या संपका&त असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या गटातील इतर 12 आमदार हे भाजपच्या संपका&त आहेत. ते काय करतील ते पुढच्या काही दिवसांत आपल्याला समजेल. परंतु या 19 आमदारांपैकी कोणाला आमच्या पक्षात घ्यायचे आणि कोणाला घ्यायचे नाही याचा निर्णय शरद पवारच घेतील. पण आमच्या पक्षप्रमुखांना आमचे एकच सांगणे आहे की, पक्षाच्या अडचणीच्या काळात जे लोक आपल्याबरोबर निष्ठsने राहिले त्यांनाच पहिले प्राधान्य द्यायला हवे. जे लोक स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष सोडून गेले त्या लोकांना, तसेच ज्यांना भाजपाने मारून-मुटकून, अडचणीत आणून तिकडे नेलं असेल त्यांना दुसरे प्राधान्य द्यावे, असे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना वाटते.
निर्णय केवळ शरद पवार घेतात
युगेंद्र पवार यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले जाणार का यावर रोहित पवार म्हणाले, कोणाला तिकीट द्यायचे आणि कोणाला तिकीट नाकारायचे याचा निर्णय केवळ शरद पवार घेतात. त्यामुळे हा प्रश्न शरद पवारांना विचारावा लागेल. अन्य एका प्रश्नावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, येत्या काळात विधानसभा निवडणुकीत विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशाची जबाबदारी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यावर टाकली तर तिथले कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये समन्वय ठेवून त्या भागात आमचे जास्त आमदार कसे निवडून आणता येतील यावर काम करेन.