रुपयाला रसातळाला गेला असून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किमतीत 7 पैशांची घसरण दिसली. रुपया गडगडल्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पेंद्र सरकार आणि पेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना एक्सवरून खोचक टोला लगावला आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला अशा बातम्या सध्या वृत्तपत्रात रोजच दिसत आहेत. परंतु, याला केंद्र सरकार किंवा अर्थमंत्री जबाबदार नाहीत. कारण नक्कीच पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती वाढत असल्याने रुपया वर जाण्याऐवजी खाली घसरत असावा आणि त्यातच जीएसटी अधिक असल्याने तो जरा जास्तच वेगाने घसरत असावा. नाहीतरी आजच्या काळात वस्तुस्थिती सांगितली तरी ऐकणार कोण? आणि ऐकणारे असेल तर याकडे लक्ष द्यावं एवढीच अपेक्षा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.