सरकार राजकीय पतंगबाजी करण्यात व्यस्त, रक्षा खडसे यांच्या मुलीबाबत झालेल्या प्रकारवरून रोहित पवार यांची टीका

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी छेड काढली. सरकार राजकीय पतंगबाजी करण्यात व्यस्त आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, राज्यात महिला सुरक्षेची स्थिती दिवसेंदिवस खालावत असून मुक्ताईनगर येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुलीसोबत घडलेला प्रकार निंदनीय आहे. तसेच टवाळखोरांनी शासकीय सुरक्षा असतानाही मुलींची काढलेली छेड हे प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे लक्षण नाही का? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. इतकं होत असतानाही सरकार मात्र निव्वळ राजकीय पतंगबाजी करण्यात व्यस्त आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अद्दल घडेल अशाप्रकारची कारवाई करावी व राज्यभरात महिला सुरक्षेबाबत सरकारने कठोर उपाययोजना कराव्यात, ही विनंती असेही रोहित पवार म्हणाले.