
बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यानेच महिलेवर अत्याचार केला आहे. बीडमध्ये पोलिसांनाही कायद्याचा धाक उरलेला नाही असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. तसेच वास्तव स्वीकारून कठोर पावलं कधी उचलणार की यंत्रणा फक्त राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठीच वापरणार? असा संतप्त सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, कुंपणाचेच शेत खाल्लं!!!बीडमध्ये गुन्हेगार मोकाट आहेतच पण आता पोलिसालाही कायद्याचा धाक उरला नसल्याचं दिसतंय. महिला दिनाच्या दिवशी पोलिसाकडूनच महिलेवर अत्याचार होत असेल तर न्याय मागायचा कुणाला? राज्याच्या वेगवेगळ्या भागात कायदा व सुव्यवस्थेचे रोज वाभाडे निघत असताना सरकार अजून किती दिवस आत्मस्तुतीत दंग राहणार? वास्तव स्वीकारून कठोर पावलं कधी उचलणार की यंत्रणा फक्त राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठीच वापरणार? असे रोहित पवार म्हणाले.
कुंपणाचेच शेत खाल्लं!!!
बीडमध्ये गुन्हेगार मोकाट आहेतच पण आता पोलिसालाही कायद्याचा धाक उरला नसल्याचं दिसतंय. महिला दिनाच्या दिवशी पोलिसाकडूनच महिलेवर अत्याचार होत असेल तर न्याय मागायचा कुणाला? राज्याच्या वेगवेगळ्या भागात कायदा व सुव्यवस्थेचे रोज वाभाडे निघत असताना सरकार अजून… pic.twitter.com/Nz9P885y5n
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 9, 2025