भाजपनेच अजित पवार यांच्या माध्यमातून पक्षात आणि कुटुंबात फूट पाडली असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला. तसेच दुसरा पाडवा सुरु करायची गरजच काय होती असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवार म्हणाले की, दिवाळी पाडव्याची सुरुवात शरद पवार यांनी बारामतीत केली होती. गेल्या 35-40 वर्षांपासून लोक पवार साहेबांना भेटायला येत आहेत. पवार साहेबांनी ही परंपरा सुरू केली आणि आता भाजपला यावरही आक्षेप आहे. त्यांनी आधी आमचे कुटुंब फोडले, आमचा पक्ष फोडला आता त्यांनी अजित पवारांच्या माध्यमातून दुसरा पाडवा सुरू केला आहे. त्यांना दुसरा पाडवा कार्यक्रम सुरू करण्याची काय गरज होती असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
#WATCH | Maharashtra: On the Diwali Padwa celebration at the residence of Sharad Pawar and Ajit Pawar, NCP-SCP leader Rohit Pawar says, “This ritual of celebrating the Diwali Padwa was started by Sharad Pawar in Baramati…People come here to meet him and for the past 35-40 years… pic.twitter.com/Xrlbq0hize
— ANI (@ANI) November 2, 2024