निष्ठावंत शिवसैनिक कधीही गद्दारी करणार नाहीत, रोह्यात शिवसेनेची आढावा बैठक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष मजबूत आहे. निष्ठावंत शिवसैनिक कधीही गद्दारी करणार नाही. त्यामुळे कुणाच्या जाण्याने कधीच संघटनेला धक्का बसत नाही. त्यामुळे सर्वांनी पक्ष वाढवण्यासाठी परिश्रम घेण्याचा निर्धार रोहा येथील आढावा बैठकीत घेण्यात आला.

दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख नंदकुमार शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत रोहा तालुक्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक झाली. यावेळी मार्गदर्शन करताना शिर्के म्हणाले, निष्ठावंत शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या सोबतच आहेत. मातोश्री आणि भगव्याशी एकनिष्ठ असणारे शिवसैनिक पक्षवाढीसाठी मेहनत घेतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवून देऊ असेही ते म्हणाले.

यावेळी शहरप्रमुख दीपक तेंडुलकर, जिल्हा संघटक सोनावणे, विभागप्रमुख नितीन वारंगे, सचिन फुलारे, कुलदीप सुतार, श्रीवर्धन मतदारसंघ युवा अधिकारी राजेश काफरे, मनोज भायतांडेल, दुर्गेश नाडकर्णी, सुनील मुटके, नीलेश वारंगे भारत वाघचौरे, सागर भगत, ओमकार गुरव, दीपक कदम, नंदू भादेकर, प्रीतम पाचांगे, मनोज लांजेकर, बाबू कडू, संजय देऊळकर, प्रीतम देशमुख, रमेश विचारे, महेश खांडेकर, शंकर भिलारे, सौरभधाटावकर, प्रकाश वलीवकर, अॅड. प्रेरित वलीवकर, शैलेश चव्हाण, सौरभ सुर्वे, मंदार गायकवाड, अनिकेत कोंडे आदी उपस्थित होते.

गाव तिथे शाखा
80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या तत्त्वानुसार लोकांच्या सुख-दुःखात शिवसैनिक धावून जातो. त्यामुळे रोहा तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत घेऊ असा निर्धार यावेळी शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडीने केला. ‘गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक’ यासाठी लवकरच मोहीम राबवली जाणार आहे.