बाईकर्स शो, रॅली, पथनाट्य; ठाण्यात उद्या रोड सेफ्टी कार्निव्हल

रस्ता सुरक्षेबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये प्रबोधन व्हावे यासाठी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार 11 जानेवारी रोजी ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे रोड सेफ्टी कार्निव्हल आयोजित करण्यात आला आहे. या कार्निव्हलमध्ये सुरक्षेचे धडे देण्याबरोबरच दुचाकी वाहनांची रॅली, बाईकर्स शो, रक्तदान शिबीर, पथनाट्य आदी उपक्रम होणार आहेत.

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत हिरानंदानी इस्टेट येथे रोड सेफ्टी मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बाईकर शो, द रेझिलिएंट फाउंडेशनमार्फत सीपीआर आणि प्रथमोपचाराबाबत प्रात्यक्षिक, नॅशनल रोड सेफ्टी काwन्सिलमार्फत घातक पदार्थाच्या सुरक्षित वाहतूक व डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंगबाबत प्रात्यक्षिके होणार आहेत. सकाळी 6 वाजता या कार्निव्हलला सुरुवात होणार आहे. नागरिकांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमदेखील होणार असून त्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन महामार्ग पोलीस विभाग ठाणे क्षेत्राच्या अधीक्षक रुपाली अंबुरे यांनी केले आहे.