रस्त्याच्याकडेला बसलेल्या नऊ जणांना भरधाव गाडीने चिरडले; चौघांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद-बुलंदशहर मार्गावर भीषण अपघात झाला. रस्त्याच्याकडेला बसलेल्या नऊ जणांना एका भरधाव वाहनाने चिरडले. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच अपघातस्थळी गाव जमा झाला. काहींनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी पोहचताच त्यांनी जखमींना तातडीने रूग्णालयात हलविले. मात्र या घटनेमुळे लोकांनी रस्ता अडवला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली.

अपघात झाल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी वाहन चालकाला पकडले, व पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान वाहनचालकाने पोलिसांना फसवूण पळूण जाण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र गावकऱ्यांनी पुन्हा त्याला पकडले.

पक्का की मधैया गावातील ग्रामस्थ शेतातील कामे आटोपल्यानंतर संध्याकाळी मुरादाबाद-बुलंदशहर मार्गावर रस्त्याच्या कडेला बसले होते. यावेळी संभळबाजूने आलेल्या भरधाव गाडीने त्यांना चिरडले. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ओमपाल, पूरणसिंह, धरमल आणि लीलाधर यांचा जागीच मृत्यू झाला.तसेच, सहा महिन्यांच्या मुलासह पाच जण गंभीर झाले आहेत. जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर गावकऱ्यांनी रास्ता रोको करत निषेध दर्शवला. पोलिस अधिक्षक अनुकृती शर्मा घटनास्थळी जाऊन लोकांना समजावले. मात्र घटनेमुळे गावात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.