Budget 2025 – हा अर्थसंकल्प म्हणजे जुन्या बाटलीत जुनीच दारू, राजद खासदार मनोज झा यांची टीका

या अर्थसंकल्पातून बिहारलाही काही मिळाले नाही अशी टीका राजद खासदार मनोज झा यांनी केली. तसेच हा अर्थसंकल्प म्हणजे जुन्या बाटलीत जुनीच दारू आहे असेही झा म्हणाले.

एएनआयशी बोलताना मनोज झा म्हणाले की, बिहारमध्ये आधीपासून मखाना संशोधन केंद्र आहे, या केंद्राचे रुपांतर बोर्डात करणार का? याचे काही मूल्यमापन केले का? हा अर्थसंकल्प म्हणजे जुन्या बाटलीत जूनीच दारू आहे. बिहारमध्ये लोक मोल मजूरीसाठी बाहेर जातात, त्यामुळे राज्यात रोजागाराची गरज आहे. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत बिहारमध्ये शेतीचे प्रश्न गंभीर आहेत, या समस्यांवर उपाय शोधले पाहिजेत.

जर कोणी म्हणत असेल की हा बिहारसाठी मांडलेला अर्थसंकल्प आहे तर ते चुकीचे आहे. बिहारला विशेष पॅकेज मिळवून देण्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही करू. गुजरातला जशी विशेष वागणूक दिली जाते तशी वागणूक बिहारला दिली पाहिजे असेही झा म्हणाले.