सिंधुदुर्गात नद्यांना पूर

रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिह्यात तब्बल 54 घरांची पडझड होऊन 22 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. 72 पुटुंबांतील 366 लोक बाधित झाले असून काही बरेच जण आपल्या नातेवाईक यांच्याकडे तर काहीजण डॉन बॉस्को, राजधानी हॉटेल येथे स्थलांतरित करण्यात आले आहेत. 3 हजार काsंबडय़ा व दुधाळ जनावरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान सोमवारी सकाळी 8 पर्यंत गेल्या 24 तासांत 216. 5 मिलीमीटरच्या सरासरीने पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस सावंतवाडी तालुक्यात झाला असून तब्बल 270.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी मध्यरात्रीपर्यंत सुमारे 24 तास नॉन स्टॉप बरसला. पावसाने क्षणाचाही उसंत घेतली नाही. पूरस्थिती, घरांची पडझड, वाहून जाणे, यामुळे सर्वच ठिकाणी हाहाकार उडाला. कसाल येथे डोंगरावरील माती महामार्गावर आल्याने वाहतूक एकमार्गी सुरू होती. आज पावसाने थोडी उसंत घेतल्याने सकाळपासून रस्त्यावरील माती काढण्याचे काम सुरू होते.

मदतकार्यासाठी एनडीआरएफची 34 सदस्यांची तुकडी जिह्यात दाखल झाली आहे. काल आपत्ती निर्माण झालेल्या ठिकाणी मदतकार्यासाठी ही टीम तैनात होती. ओरोस येथील ख्रिश्चन वाडी येथे 50 पेक्षा घरांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला आहे. 8 घरे पूर्णपणे कोसळली आहेत. लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

366 लोक बाधित
पुडाळात गुडीपुर शेटकर वाडीमधील 30 बाधित झाले आहेत. टेंब धुरीनगर येथील 21 बाधित झाले आहेत. बिबवणे येथील 30, ओरोस ख्रिश्चनवाडी येथील 235, आंबेडकर नगरातील 45 व कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथील 5 जणांचा समावेश आहे.

कोणत्या तालुक्यात किती नुकसान…
दोडामार्ग तालुक्यात 15 घरांची पडझड होऊन 3 लाख 77 हजार 500 रुपयांची नुकसानी झाली आहे. सावंतवाडीमध्ये एक घर व एक कंपाऊंड वॉल कोसळून 35 हजार रुपये नुकसानी झाली आहे. पुडाळ तालुक्यात 3 हजार कोंबडय़ा मृत पावल्या व 3 घरांची पडझड होऊन 3 लाख रुपयांचे नुकसान झाले. कणकवलीमध्ये 20 घरांची पडझड होऊन 3 लाख 70 हजार 850 रुपयांचे नुकसान झाले. देवगडमध्ये 6 घरे, एक पंपाऊंड वॉल व एका घरात पाणी शिरल्याने 6 लाख 45 हजार 650 रुपयांची नुकसान झाले. वैभववाडीमध्ये 6 घरे, 2 शेतविहिर, 1 गोठा कोसळून 61 हजार रुपयांचे नुकसान झाले. मालवणमध्ये 3 घरांची पडझड झाली, 2 घरात पाणी शिरले व गणपती कारखान्यात पाणी शिरल्याने 4 लाख 9 हजार 300 रुपयांचे नुकसान झाले आहे.

देवगडात14 लाखांचे नुकसान
देवगड तालुक्यात रविवारी सायंकाळी सोमवारी दुपारपर्यंत वादळी वाऱयासह झालेल्या मुसळधार अतिवृष्टीने हाहाकार माजविला. तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत होते बऱयाच ठिकाणी सकल भागातील कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर वाडा चांभारभाटी पुलानजीक पाणी आल्याने पडेल देवगडची वाहतूक बंद होती. देवगड नांदगाव मुख्य रस्त्यावर घाटे पेट्रोलपंप ते फाटक क्लास वडंबापर्यंत पाणी आल्याने वाहतुकीचा वेग ही मंदावला होता. या मुसळधार अतिवृष्टीमुळे माड बागायती तसेच शेतजमिनी पाण्याखाली आल्याने मोठे नुकसान झाले आहे.या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन अंदाजे सुमारे 14 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. देवगड तालुक्यात सर्वाधिक 198 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.