ऋतुराज गायकवाडकडे पुन्हा महाराष्ट्राची धुरा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी संघ जाहीर

‘बीसीसीआय’च्या सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी मंगळवारी महाराष्ट्र संघाची घोषणा झाली. ऋतुराज गायकवाडकडे महाराष्ट्र संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव अॅड. कमलेश पिसाळ यांनी हा संघ जाहीर केला.

हिंदुस्थान ‘अ’ संघाचा कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेला ऋतुराज आता मायदेशी परतला आहे. हैदराबादमध्ये 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. महाराष्ट्राचा पहिला सामना नागालॅण्डविरुद्ध 23 नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राची गाठ 25 नोव्हेंबरला केरळ, 27 नोव्हेंबरला मुंबई, 29 नोव्हेंबरला आंध्र प्रदेश, 3 डिसेंबरला गोवा व 5 नोव्हेंबरला सेनादल या संघांशी पडणार आहे.

निवड झालेला महाराष्ट्राचा संघ ः ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अंकित बावणे, अर्शिन कुलकर्णी, राहुल त्रिपाठी, निखिल नाईक (यष्टिरक्षक), धनराज शिंदे (यष्टिरक्षक), दिव्यांग हिंगणेकर, विक्की ओस्तवाल, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, प्रशांत सोळंकी, अथर्व काळे, सिद्धार्थ म्हात्रे, सत्यजीत बछाव, राजवर्धन हंगर्गेकर, अझीम काजी, ऋषभ राठोड, सनी पंडित.