मृत मित्राच्या आठवणीत बनवला लाइटवाले हेल्मेट 

रितेश कोचेता हा क्रूझर नावाच्या कंपनीचा संस्थापक. आपल्या मित्राला अपघातात गमावल्यानंतर रितेशने लाइटवाले हेल्मेट बनवण्याचा निर्णय घेतला. त्याने बनवलेल्या हेल्मेटमध्ये लाल रंगाचे लुकलुकणारे दिवे आहेत. ‘2010 मध्ये हेल्मेटअभावी मित्राचा अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे खूप नैराश्य आले. त्याला ज्या ट्रकने उडवले त्या ट्रक चालकाने रात्रीच्या अंधारात काहीच दिसले नसल्याचे कारण दिले. त्यामुळे रात्रीच्या अंधारात लुकलुकणारे हेल्मेट बनवण्याची कल्पना सुचली’, असे रितेश सांगतो. त्याची आता वार्षिक उलाढाल 1.5 कोटींच्या घरात आहे. रितेशने मित्राच्या मृत्यूनंतर अशी उत्पादने बनवण्याचा विचार केला. रात्रीच्या अंधारात समोरून येणाऱ्या वाहनांना आपण दिसलो तरच आपला जीव वाचू शकतो. मी सर्वप्रथम खांद्यावर घालण्यायोग्य एक उपकरण बनवले होते. त्यात दिवे बसवले होते. कोणी रात्री गाडी चालवताना ते घातले तर त्याच्या मागे असलेली व्यक्ती अंधारातही त्याला पाहू शकते, असे रितेशने सांगितले.