Riteish Deshmukh- ‘राजा शिवाजी’ चित्रपटात तुम्हालाही चमकायचं आहे का? वाचा सविस्तर

‘लय भारी’ फेम अभिनेता रितेश देशमुख याने त्याच्या चाहत्यांना नुकतीच एक आनंदाची बातमी दिली आहे. रितेश गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटावर काम करत आहे. म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून रितेशची हेअरस्टाइल देखील बदललेली दिसून येत आहे. रितेशने ‘राजा शिवाजी’ या चित्रपटावर आता काम सुरु केले असून, गेले कित्येक दिवस तो या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे.

‘राजा शिवाजी’ हा चित्रपट रितेशसाठी खूप महत्त्वाचा चित्रपट असून, त्याने काही वर्षांपूर्वी या चित्रपटाची घोषणा केली होती. रितेशच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या नावासाठी एक विशेष लोगो बनवून हवा आहे. हा लोगो मराठी आणि भाषेत डिझाइन करवुन हवा आहे. म्हणूनच रितेशने त्याच्या फॅन्सना आवाहन केले आहे. हा लोगो मूळातच त्याला क्रिएटीव्ह हवा असल्याकारणाने, रितेशने त्याच्या चाहत्यांच्या खांद्यावर लोगोची जबाबदारी सोपवली आहे. म्हणूनच नुकताच त्याने एका व्हिडीओच्या माध्यमातून, हा लोगो हवा असल्याचे जाहीर केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)


रितेशने शेअर केलेल्या मेल आयडीवर डिझाइन पाठवायला सांगितले आहे. निवडण्यात येणारी डिझायनरला योग्य श्रेय देण्याचेही रितेशने जाहीर केले आहे.

येत्या काही दिवसांमध्ये रितेश हा आपल्याला रेड २ या चित्रपटात विलनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. सध्याच्या घडीला तो आगामी राजा शिवाजी या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे.