Assembly Election 2024 – रिसोडमध्ये महायुतीत साठमारी, बंडखोरीमुळे उडाले खटके

विधानसभा निवडणूक सुरू आहे, त्यातच महायुतीतली धुसफूस समोर आली आहे. वाशिममध्ये भाजपने युती धर्म पाळला नाही असा आरोप मिंधे गटाने केला आहे. तसेच भाजपने वेळीच काही केले नाही तर मिंधे गटाने भाजपला अल्टिमेटमही दिला आहे.

एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. रिसोड विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार भावना गवळी यांना मिंधे गटाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजप नेते अनंतराव देशमुख नाराज झाले आणि त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे मिंधे गटातले पदाधिकारी संतापले आहेत. भाजपने युती धर्म पाळावा अशा शब्दांत मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपला सुनावले आहे. तसेच भाजपने देशमुख यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग नाही पाडले तर इतर दोन मतदारसंघात भाजपचे काम करणार नाही असा इशाराच या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.