आर. अश्विननंतर टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूची निवृत्तीची घोषणा, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

सिडनी येथे खेळल्या गेलेल्या 2025 च्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने दहा वर्षांनी मालिका गमावल्याने चाहते निराश झालेत. अशातच मालिकेदरम्यान आर. अश्निन याने अचानक निवृत्ती जाहीर केली. यामुळे सर्वांना धक्का बसला होता. आता आणखी एका खेळाडूने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे.

कसोटी मालिकेतील पराभवानंतर टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू ऋषी धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. ऋषी धवन याने केलेली सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. ऋषी धवनने लिमिटेड ओवर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता ऋषी धवन रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याची शक्यता आहे.

हा निर्णय घेताना मी भावनिक झालोय, पण मी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. यासाठी मला कोणतीही खंत वाटत नाही. कारण मला क्रिकेटने गेल्या 20 वर्षांमध्ये खूप काही दिलं आहे. या प्रवासामध्ये माझ्या अनेक आठवणी आहेत. बीसीसीआय, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन, पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या सर्वांनी मला संधी दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला माझ्या देशाचे प्रतिनिधित्त्व करता आलं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब असल्याचं ऋषी धवन यानी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.