पंतच्या लखनौपुढे अय्यरच्या पंजाबचे आव्हान

आयपीएलमध्ये जोरदार खेळ करणाऱया ऋषभ पंतच्या लखनौपुढे श्रेयस अय्यरच्या पंजाबचे आव्हान असेल. लखनौने आपल्या दोन्ही सामन्यांत खणखणीत फलंदाजी केलीय आणि निकोलस पूरनने दोन्ही सामन्यांत झंझावाती अर्धशतकी खेळय़ा साकारल्या आहेत. सोबतीला एडन मार्करम आणि डेव्हिड मिलरसुद्धा आहे. दुसरीकडे पंजाबला एकमेव सामन्यात श्रेयस अय्यरच्या घणाघाताने विजय मिळवून दिला होता. उद्या पंजाबला ग्लेन मॅक्सवेल आणि मार्क स्टॉयनिसच्या फटकेबाजीची प्रतीक्षा असेल. उभय संघाचे संभाव्य अकरा खेळाडू ः पंजाब- प्रभसिमरन सिंह (यष्टिरक्षक), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंह, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अझमतुल्लाह ओमरझई, माकां यान्सन, अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल. लखनौ- एडन मार्करम,निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार-यष्टिरक्षक), डेव्हिड मिलर, आयुष बदोनी, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, आवेश खान, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव