दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार आणि टीम इंडियाचा धडाकेबाज यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासातील सर्वात श्रीमंत खेळाडू ठरला. लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल लिलावातील सर्व विक्रम मोडीत काढत या झुंजार खेळाडूसाठी तब्बल 27 कोटी रुपये मोजले. पंतच्या काही मिनिटे आधी पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरला 26.75 कोटी रुपयांच्या मोबदल्यात आपल्या संघात घेतले, मात्र तो औटघटकेचा विक्रमवीर ठरला. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने 23.75 कोटी रुपयांना घेतलेला व्यंकटेश अय्यर तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला.
पंतसाठी कोटी कोटी उड्डाणे
ऋषभ पंत दोन कोटींच्या मूळ किमतीसह लिलावात उतरला होता, मात्र या आक्रमक खेळाडूसाठी अल्पावधीतच कोटी कोटी उड्डाणे सुरू झाली. त्याची किंमत 10 कोटींच्या पुढे गेल्यानंतर सनरायझर्स हैदराबादनेही लिलावाच्या शर्यतीत उडी घेतली. हैदराबादची संघ मालकीण काव्या मारन आणि लखनौचे मालक संजय गोयंका यांच्यातील रस्सीखेचामुळे काही वेळातच पंतची किंमत 17 कोटींच्या पुढे गेली. लखनौने पंतसाठी 20.75 कोटी रुपयांची बोली लावताच हैदराबादने बोलीतून माघार घेतली. मात्र दिल्लीने आरटीएमचा (राईट टू मॅच) वापर केला. मात्र त्यानंतर लखनौने पंतसाठी थेट विक्रमी 27 कोटींची बोली लावताच दिल्लीने हात मागे घेतला. अशा प्रकारे पंतला 27 कोटी रुपयांच्या मोबदल्यात लखनौने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून संघात सामील केले.
युझवेंद्र ठरला महागडा हिंदुस्थानी फिरकीपटू
पंजाब किंग्जने फिरकीपटू युझवेंद्र चहलला तब्बल 18 कोटी रुपयांना आपल्या संघासाठी खरेदी केले. त्याचे आधारभूत मूल्य दोन कोटी रुपये होते. गतवर्षी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने 15 सामन्यांत 18 बळी टिपले होते. युझवेंद्र हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बळी टिपणारा फिरकी गोलंदाज होय. 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱया या बारीक चणीच्या गोलंदाजांने आतापर्यंत 160 सामने खेळत 205 फलंदाज बाद केले आहेत.
श्रेयसनंतर व्यंकटेश अय्यरचा बोलबाला
यंदाच्या लिलावात श्रेयस अय्यरला दुसऱया क्रमांकाची 26.75 कोटी रुपयांची सर्वोच्च बोली मिळावर श्रेयस अय्यरचा बोलबाला बघायला मिळाला. या टी-20 फेम खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये चांगलीच चुरस रंगली. शेवटी कोलकात्याने त्याला 23.75 कोटी रुपयांत विकत घेण्यात यश मिळविले.
चेन्नई सुपर किंग्ज ः नूर अहमद ः 10 कोटी, रविचंद्रन अश्विन ः 9.75 कोटी, डेवॉन कॉन्वे ः 6.25 कोटी, खलिल अहमद ः 4.80 कोटी, रचिन रवींद्र ः 3.20 कोटी, राहुल त्रिपाठी ः 3.40 कोटी.
दिल्ली पॅपिटल्स ः के. एल. राहुल ः 14 कोटी, मिचेल स्टार्क ः 11.75 कोटी, टी. नटराजन ः 10.75 कोटी, जॅक फ्रेजर ः 9 कोटी, हॅरी ब्रुक ः 6.25 कोटी, करुण नायर ः 50 लाख (अनपॅप्ड).
गुजरात टायटन्स ः जोस बटलर ः 15.75 कोटी, मोहम्मद सिराज ः 12.25 कोटी, पॅगिसो रबाडा ः 10.75, प्रसिध कृष्णा ः 9.50 कोटी.
कोलकाता नाईट रायडर्स ः व्यंकटेश अय्यर ः 23.75 कोटी, एन्रीच नॉर्किया ः 6.50 कोटी, क्विंटन डी कॉक ः 3.60 कोटी, अंगक्रिष रघुवंशी ः 3 कोटी (अनपॅप्ड), रहमानुल्लाह गुरबाज ः 2 कोटी.
लखनौ सुपर जायंट्स ः ऋषभ पंत ः 27 कोटी, आवेश खान ः 9.75 कोटी, डेव्हिड मिलर ः 7.50 कोटी, मिचेल मार्श ः 3.40 कोटी. एडेन मार्करम ः 2 कोटी.
मुंबई इंडियन्स ः ट्रेंट बोल्ट ः 12.50 कोटी.
पंजाब किंग्ज ः श्रेयस अय्यर ः 26.75 कोटी, युझवेंद्र चहल ः 18 कोटी, अर्शदीप सिंह ः 18 कोटी, मार्कस स्टॉयनिस ः 10 कोटी, नेहाल वढेरा ः 4.20 कोटी (अनपॅप्ड), ग्लेन मॅक्सवेल ः 4.20 कोटी.
राजस्थान रॉयल्स ः जोफ्रा आर्चर ः 12.50 कोटी, वानिंदू हसरंगा ः 5.25 कोटी, महिश तिक्षणा ः 4.40 कोटी.
n रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ः जोस हेजलवूड ः 12.50 कोटी, फील सॉल्ट ः 11.50 कोटी, जितेश शर्मा ः 11 कोटी, लियाम लिव्हिंगस्टोन ः 8.75 कोटी.
n सनरायझर्स हैदराबाद ः इशान किशन ः 11.25 कोटी, मोहम्मद शमी ः 10 कोटी, हर्षल पटेल ः 8 कोटी, राहुल चहर ः 3.20 कोटी, अॅडम झम्पा ः 2.40 कोटी, अथर्व तायडे ः 30 लाख (अनपॅप्ड).