‘कांतारा’ या सिनेमामुळे अभिनेता ऋषभ शेट्टी चांगलाच चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला ते त्याच्या आगामी सिनेमा ‘द प्राईड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज’ या चित्रपटामुळे. सध्या सोशल मीडियावर ऋषभ शेट्टीच्या अपकमिंगं सिनेमाचे पोस्टर व्हायरल होत असून ते लक्षवेधक ठरत आहे. या पोस्टरमध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन संदीप सिंह करत आहेत.
ऋषभ शेट्टी आणि प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप सिंह यांनी ‘द प्राईड ऑफ भारत : छत्रपती शिवाजी महाराज’. या सिनेमाच्या माध्यमातून मराठ्यांच्या राजाची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. त्याची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. या सिनेमाचे पोस्टर रिलीज केले असून यामध्ये ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे.
View this post on Instagram
हा सिनेमा 27 जानेवारी रोजी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध होणार आहे. ऋषभ शेट्टीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहीले की, आपला सन्मान आणि विशेषाधिकार, हिंदुस्थानचा महान योद्धा राजाची महाकाव्य गाथा प्रस्तुत करतोय… द प्राइड ऑफ भारत: छत्रपति शिवाजी महाराज. हा फक्त एक सिनेमा नाही, तर एका योद्धाच्या सन्मानार्थ एक लढाईचा युद्धघोष आहे, ज्यानं सर्व अडचणींविरुद्ध लढा दिला, बलाढ्य मुघल साम्राज्याच्या सामर्थ्याला आव्हान दिलं आणि कधीही न विसरता येणारा वारसा निर्माण केला, असे ऋषभ शेट्टीने पोस्टमध्ये लिहीले आहे.