येताना XL साईज कंडोम घेऊन ये…! प्रसिद्ध उद्योगपतीच्या पत्नीचे चॅट व्हायरल

तमिळनाडूतील हायप्रोफाईल घरगुती वादाचे प्रकरण समोर आले आहे. रिपलिंग कंपनीचे सहसंस्थापक प्रसन्न शंकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोमुळे ते सध्या चर्चेत आले आहेत. सध्या त्यांचे वैवाहिक जीवन विस्कळीत झाले असून त्यांनी पत्नीबाबत माहिती उघड करत आरोपही केले आहेत. याच संदर्भातील काही पुरावे प्रसन्न यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मुलाचे अपहरण आणि मानसिक छळ केल्याचा आरोप प्रसन्न यांनी पत्नीवर केला आहे. यासोबत पत्नीचे अफेअर असून तिचे आणि तिच्या प्रियकराचे वैयक्तिक चॅट्सही पुरावे म्हणून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसन्न शंकर आणि त्यांची पत्नी दिव्या शशिधर यांची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तिरूचिरापल्ली येथे भेट झाली होती. 10 वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले असून त्यांना 9 वर्षांचा एक मुलगा आहे. मात्र तरीही दिव्या आपली फसवणूक करत असून तिचे गेल्या 6 महिन्यांपासून एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध आहेत. अनुप असे त्याचे नाव आहे. याबाबतची माहिती अनूपच्या पत्नीकडूनच मिळाल्याचे प्रसन्न यांनी सांगितले.

अनूपच्या पत्नीनेच या दोघांमधील चॅटचे पुरावे प्रसन्न शंकर यांना पाठवले. यानंतर प्रसन्न यांनी हे पुरावे थेट सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. प्रसन्न यांनी शेअर केलल्या स्क्रिनशॉटमध्ये त्यांच्या पत्नीने तिच्या बॉयफ्रेंडला एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावल्याचे संभाषण आहे. एवढेच नाही तर येताना सोबत एक्सएल कंडोम घेऊन येण्यास सांगितले. हे स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

पत्नीच्या अफेअरबद्दल समजल्यानंतर प्रसन्नने घटस्फोट घेण्याचे ठरवले होते. मात्र, यादरम्यान तिने माझ्यावर अनेक आरोप केले. तिने माझ्याविरुद्ध मारहाणीची तसेच बलात्काराची तक्रार केली. यानंतर सिंगापूर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून मला या आरोपातून मुक्त केले आहे, असे प्रसन्न शंकर यांनी सांगितले.