मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरु पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रिंकूचा नवा चित्रपट ‘आशा’ लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. याआधी रिंकूने मराठी सिनेसृष्टीसोबतच हिंदी आणि कन्नड चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
रिंकूच्या या चित्रपटाला नववर्षाच्या सुरुवातीलाच थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल स्पर्धेत मानांकन मिळाले आहे. या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. यात रिंकू राजगुरु आशा वर्करच्या भूमिकेत दिसून येत आहे.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत रिंकूने ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे. “नव वर्षाची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा सुंदर गोष्ट असू शकत नाही! ‘आशा’ चित्रपट प्रतिष्ठित थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलच्या स्पर्धा विभागासाठी निवडला गेल्याची घोषणा करताना अभिमान वाटतो!” असे रिंकूने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. रिंकूच्या पोस्टवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटीजकडून अभिनंदन करण्यात येत आहे.