आरटीईच्या 25 टक्के कोटय़ातंर्गत शाळा प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. पालकांना आता 4 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातून ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रीया 17 मे पासून सुरू झाली. ही मुदत आज 31 मे रोजी मुदत संपल्याने प्राथमिक शिक्षण संचालनालयाने अर्ज करण्यास 4 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 4 जूनपर्यंतची मुदतवाढ अंतिम असून कोणत्याही परिस्थितीत अर्ज करण्याची मुदत वाढवून मिळणार नाही, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिल्या आहेत. दरम्यान, राज्यातील सर्वच शाळात आरटीई प्रवेशात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.