हिंदू जिमखान्याच्या विजयात बिस्ताच चमकला

आरएफएस तल्यारखान स्मृती निमंत्रित टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत पी. जे. हिंदू जिमखान्याने जय बिस्ताच्या तडाखेबंद 99 धावांच्या अभेद्य खेळीच्या जोरावर इस्लाम जिमखान्याचा 8 विकेटने पराभव केला.

बॉम्बे जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत इस्लाम जिमखाना संघाचे 180 धावांचे लक्ष्य पी. जे. हिंदू जिमखाना संघाने 16.4 षटकांत 2 विकेटच्या बदल्यात पार केले. जय बिस्ताने (नाबाद 99) आणि ऋग्वेद मोरेसह (64 धावा) 13.2 षटकांत 152 धावांची दमदार सलामी देत विजय सुकर केला. जयने 50 चेंडूंत 6 षटकार आणि 9 चौकारांसह सर्वोत्तम खेळी केली, मात्र त्याचे शतक पूर्ण झाले नाही. ऋग्वेद मोरे 42 चेंडूंत 10 चौकारांसह अर्धशतक ठोकताना त्याला चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलकः इस्लाम जिमखाना 20 षटकांत 6 बाद 179 (हार्दिक तामोरे 46, विनायक भोईर 35, अख्तर शेख 32, प्रवीण शेट्टी 25; प्रतीक मिश्रा 3/33) वि. पी. जे. हिंदू जिमखाना 16.4 षटकांत 2 बाद 180 (जय बिस्ता 99 न.ओ. (50 चेंडूंत 6 षटकार, 9 चौकार), ऋग्वेद मोरे 64 (42 चेंडूंत 10 चौकार); नदीम शेख 2/36).