New RBI Governor: संजय मल्होत्रा ​​RBI चे नवे गव्हर्नर, शक्तीकांत दास यांची घेणार जागा

संजय मल्होत्रा हे आरबीआयचे नवे गव्हर्नर असणार आहेत. त्यांचा कार्यकाळ पुढील 3 वर्षांचा असेल. ते सध्याचे आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची जागा घेतील. आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा कार्यकाळही 10 डिसेंबर रोजी संपत आहे. 2022 मध्ये वित्तीय सेवा विभाग (DFS) सचिव संजय मल्होत्रा ​​यांना केंद्राने रिझर्व्ह बँकेचे (RBI) संचालक म्हणून नामनिर्देशित केले होते.

कोण आहेत संजय मल्होत्रा?

संजय मल्होत्रा ​​हे राजस्थान केडरचे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये आरईसीचे अध्यक्ष आणि एमडी झाले. याआधी त्यांनी ऊर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव पदावरही काम केले होते.

संजय मल्होत्रा ​​यांनी आयआयटी कानपूरमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. तेथे त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. गेल्या 30 वर्षांपासून मल्होत्रा ​​यांनी ऊर्जा, वित्त, आयटी आणि खाण या खात्यांमध्ये काम केले आहे. दरम्यान, उर्जित पटेल यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर शक्तीकांता दास यांनी सहा वर्षांपूर्वी आरबीआय गव्हर्नरपदाची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर आता 10 डिसेंबर रोजी त्यांचा कार्यकाळ संपत आहे.