विद्यार्थ्यांची मनशक्ती वाढवण्याचे काम शिक्षक आणि पालकांचेही

शाळेतील विद्यार्थ्यांना मानसिकदृष्टटय़ा शक्तिशाली बनवणे हे काम शिक्षकांबरोबरच पालकांचेही आहे. यासाठी प्रेरणादायी व्यक्तींची भाषणे मुलांना ऐकवली पाहिजे. त्यांना ध्यानधारणा करण्यास शिक्षक, पालकांनी शिकविले पाहिजे. शाळेच्या व्यवस्थापनाने सुद्धा याकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्य शासनाच्या विधी न्याय विभागाचे सचिव सतीश वाघोले यांनी काल येथे बोलताना केले.

जुन्नर तालुका आळे येथील  ‘ज्ञानमंदिर माजी विद्यार्थी संघ-मुंबई’या संस्थेचे स्नेहसंमेलन काल सोमवारी घाटकोपर पूर्व येथील झवेरबेन हॉलमध्ये प्रचंड उत्साहात संपन्न झाले.  स्नेहसंमेलनानिमित्त काढण्यात आलेल्या ज्ञानमंदिर स्मरणिकाचे प्रकाशनही याप्रसंगी करण्यात आले. यावेळी ज्ञानमंदिर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अशोक गुंजाळ, सचिव  कुऱहाडे, ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे संचालक शांताराम कुहाडे, अर्जुन पाडेकर, ज्ञानराज इंग्लिश मीडियमचे अध्यक्ष नेताजी दादा डोके,  प्रसन्ना डोके, मारुती पाडेकर, भागाजी शेळके आदी उपस्थित होते.