सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नीट यूजीचा निकाल पुन्हा जाहीर

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) नीट यूजीच्या उमेदवारांचे निकाल पुन्हा जाहीर केले आहेत. हे निकाल जाहीर करताना एनटीएने विद्यार्थ्यांची ओळख जाहीर केलेली नाही. 18 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान मिळालेल्या सूचनांचे पालन करून एनटीएने आज नीटचा निकाल पुन्हा जाहीर केला. न्यायालयाने आज शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती. उमेदवार exam.nta.ac.in/NEET/ या वेबसाईटवर जाऊन सुधारित निकाल पाहू शकतात. याप्रकरणी 40 हून अधिक याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने एनटीएला नीटचे निकाल शहर आणि पेंद्रनुसार पुन्हा जाहीर करण्याचे आदेश दिले होते. 18 जुलैच्या सुनावणीत न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने एनटीएला विद्यार्थ्यांची ओळख जाहीर न करता निकाल लावण्याचे आदेश दिले होते.