
सर्वांनी मातृभाषेप्रमाणे इतरही सर्व भाषांचा सन्मान करायला हवा, असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. आज आंतरराष्ट्रीय मातृदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी बंगाली भाषेचे महत्त्व सांगितले. बंगाली ही जगातील पाचवी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे आणि प्रत्येक बंगाली नागरिकाला याचा अभिमान वाटतो. बंगाली भाषेबद्दल भावनिक ओढ असणे साहजिकच आहे. परंतु आपण इतरांच्याही भाषांचा तितकाच आदर केला पाहिजे, असे ममता बॅनर्जी यांनी नमूद केले.