रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात; गृह कर्ज, वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टेरीफ वॉर’चा परिणाम जागतिक बाजरपेठेवर होत आहे. यातून महागाई आणखी भडकण्याची शक्यता लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 25 बेसिक पॉइंट म्हणजे 0.25 टक्के कपात केली असून यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चालू आर्थिक वर्षे 2025-26ची सुरुवात चिंता वाढवणारी आहे. जागतिक समुदाय अस्वस्थ आहे, अशी कबुलीच गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली आहे.

1 एप्रिलपासून सुरू झालेल्या चालू आर्थिक वर्षातील 2025-26ची पहिली रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक आज झाली. त्यात रेपो दरामध्ये 0.25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे रेपो दर आता 6 टक्के झाला आहे. रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा हे दर 0.25 टक्क्यांनी कमी केले आहेत.

z सोने तारण कर्जातील वाढत्या जोखीम आणि अनियमितता लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने या क्षेत्रासाठी व्यापक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. संजय मल्होत्रा यांनी सोन्याच्या कर्जांवरील बँका आणि एनबीएफसींच्या मनमानीबद्दल चिंता व्यक्त केली.