आरबीआयचे लंडनमधील 100 टन सोने हिंदुस्थानात

लोकसभा 2024 च्या निवडणुकीचा निकाल अवघ्या चार दिवसांवर आलेला असतानाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने लंडनमधील 100 टन सोने हिंदुस्थानात आणले आहे. आरबीआयने अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याआधी 33 वर्षांपूर्वी म्हणजेच 1991 मध्ये आर्थिक घडामोडींदरम्यान एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर सोने हिंदुस्थानात आणण्यात आले होते. तसेच, येत्या काही महिन्यांत आणखी इतकेच सोने पुन्हा एकदा लंडनमधून हिंदुस्थानातून आणले जाईल, असे आरबीआयने म्हटले आहे. हिंदुस्थानात दाखल झालेले 100 टन सोने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचेच असून लंडनमधील बँक ऑफ इंग्लंडच्या सुरक्षेत ठेवण्यात आले होते. आरबीआयनेही सोन्याच्या साठय़ापैकी काही सोने बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेवले होते.