आरबीआयचा जोरदार दणका, 11 बँकांचा परवाना रद्द, मुंबईतील द सिटी बँकेचा समावेश

मावळत्या वर्षात बेशिस्त व्यवहार करणाऱ्या अकरा बँकांचा परवाना रद्द करून रिझर्व्ह बँकेने जोरदार दणका दिला आहे. यात महाराष्ट्रातील जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँक आणि द सिटी को ऑपरेटिव्ह बँकेचा समावेश आहे. या बँकांचे संपूर्ण व्यवहार बंद करण्यात आले आहेत.

बँकिंग नियमांचे वारंवार उल्लंघन, बेशिस्तीचा कळस यामुळे देशभरातील अकरा बँकांचा परवाना रद्द करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. या बँका पुढे चालू राहणे ग्राहकांच्या हिताचे नाही. त्यामुळे सार्वजनिक हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

बंद झालेल्या बँका

  • दुर्गा को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक विजयवाडा, आंध्र प्रदेश
  • श्री महालक्ष्मी मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक दाभोई, गुजरात
  • द हिरीयुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक हिरीयुर, कर्नाटक
  • जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँक वसमत, महाराष्ट्र
  • सुमेरपूर मर्कंटाईल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, राजस्थान
  • पूर्वांचल को-ऑपरेटिव्ह बँक गाजीपूर, उत्तर प्रदेश
  • द सिटी को ऑपरेटिव्ह बँक मुंबई, महाराष्ट्र
  • बनारस मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक, वाराणसी
  • शिम्शा सहकारी बँक मद्दूर, मंड्या, कर्नाटक
  • उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह बँक आंध्र प्रदेश
  • द महाभैरव को-ऑपरेटिव्ह बँक, तेजपूर, आसाम