ऐन उन्हाळ्यात झाडांचे पुनर्रोपण; झाडे मरणासन्न अवस्थेत, पालिकेच्या उद्यान विभागाचा चुकीचा कारभार

महापालिकेने निगडी ते पिंपरी मेट्रो प्रकल्प, पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाला अडथळा ठरणाऱ्या झाडांचे आकुर्डीतील रेल्वे मार्गालगत पुनर्रोपण केले आहे. मात्र, ऐन उन्हाळ्यात झाडांचे पुनर्रोपण केल्याने त्या झाडांची अवस्था बिकट झाली असून, सर्वच झाडे मरणासन्न स्थितीत गेली आहेत. त्यामुळे पुनर्रोपण केलेल्या झाडांची उद्यान विभागाने योग्य निगा न राखल्याचे समोर आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने विविध विकास कामासाठी त्या त्या परिसरातून काढलेल्या शेकडो हजार झाडांचे आकुडींतील रेल्वे मार्गालगत पुनर्रोपण करण्यात आले आहे. हे पुनर्रोपण ऐन उन्हाळ्यात केल्याने झाडांची अवस्था बिकट झाली आहे. महापालिकेचा उद्यान विभागाकडून एकीकडे पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला जात असताना दुसरीकडे मात्र पुनर्रोपण करण्यात आलेल्या झाडांची योग्य प्रकारे निगा न राखल्याने मोठ्या प्रमाणात झाडे दगावल्याने वृक्षप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.

आकुर्डी रेल्वे मार्गालगत गेल्या एक ते दीड महिन्यांपूर्वी झाडांचे पुनर्रोपण केलेले आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने नियुक्ती केलेल्या ठेकेदाराकडून झाडांचे पुनर्रोपण करताना झाड बुंध्यापासून अलगद उखडून आणून खोल खड्डा खोदून पुनर्रोपण करणे आवश्यक होते. मात्र, काही ठिकाणी दोन ते अडीच फूट खोल खड्डा केल्याचे दिसून येत आहे. तर अनेक झाडांची कापणी करून लावण्यात आल्याने झाडे दगावली असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, महापालिकेच्या उद्यान विभागाकडून ठेकेदाराकडून झाडांचे पुनर्रोपण केलेले आहे. हे पुनर्रोपण करताना कोणत्याही शास्त्रीय पध्दतीने झालेले नाही. उन्हाळ्यात झाडे लावल्याने त्या झाडांना पाणीदेखील घातले नाही. केवळ खड्डे खोदून सगळी झाडे उभी केलेली | दिसत आहेत. त्यामुळे ठेकेदाराकडूनदेखील केवळ | महापालिकेने पुनर्रोपण करण्यास दिलेल्या झाडांवर बिले | लाटण्याचा प्रकार केला जात असून, त्या झाडांची योग्य | काळजी घेताना दिसत नाहीत. त्यामुळे पर्यावरणप्रेमी | नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आकुर्डी येथील रेल्वे मागांलगत शेकडो पुनर्रोपण केले आहे. या झाडांचे पुनर्रोपण जूननंतर करायला हवे. मृग नक्षत्राचा पहिला पाऊस झाल्यावर जमिनीत ओलावा तयार होतो. त्यानंतर | झाडांचे पुनर्रोपण केल्यास ते झाड व्यवस्थितपणे| जमिनीशी तग धरू शकते. त्या झाडांची मुळेदेखील | जमिनीतील ओलाव्यामुळे सर्वत्र पसरून झाडांची वाढ होऊ शकते. महापालिकेच्या उद्यान विभागाकडून झाडांचे पुनर्रोपण करताना व्यवस्थित खड्डे काढलेले नाहीत. मुरुमातच दोन बाय दोनची खड्डे काढून झाडे लावली आहेत. मात्र, त्या झाडांना पाणी घालूनदेखील सगळी झाडे मरणाच्या दारात उभी ठाकली आहेत. त्यामुळे झाडांचे पुनर्रोपण करून काहीच उपयोग होणार नाही. उलट लावलेल्या झाडांवर केलेला खर्च वायफळ जाणार आहे.

– प्रशांत राऊळ, पर्यावरण प्रेमी.