
प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्राrय गायिका इंद्राणी मुखर्जी 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता एनसीपीएतील एक्सपेरिमेंटल थिएटर येथे आपल्या मधुर आवाजाची सुरेख मैफल रंगवणार आहेत. या संगीतमय मैफलीत प्रेक्षकांना उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध ख्याल, ठुमरी आणि विविध लोकप्रकारांची विलोभनीय संध्याकाळ अनुभवायला मिळेल.
पंचम निषादच्या वतीने या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रागदारी संगीत’ आणि ‘पूरब अंग ठुमरी’ या चित्रपटांमधील योगदानासाठी गायिका इंद्राणी मुखर्जी खासकरुन ओळखल्या जातात. या संगीत मैफलीत त्या ख्यालच्या सर्व सुरेल रचनांसह ठुमरी, दादरामधील भावपूर्ण कथानक प्रेक्षकांसमोर सादर करतील. त्यांना तबलावादक पंडित रामकुमार मिश्रा, हार्मोनियमवादक विजय मिश्रा आणि सारंगीवादक संगीत मिश्रा साथ देतील.