विनोदकुमार शुक्ल यांना ‘ज्ञानपीठ’

प्रसिद्ध हिंदी साहित्यिक विनोदकुमार शुक्ल यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्ञानपीठ निवड समितीने शनिवारी ही घोषणा केली. छत्तीसगडमधील साहित्यिकाला प्रथमच हा पुरस्कार मिळत आहे.

छत्तीसगडच्या राजनांदगाव येथे 1937 मध्ये जन्मलेले विनोदकुमार शुक्ल हे गेल्या 50 वर्षांपासून साहित्यसेवा करत आहेत. 1971 मध्ये त्यांचा ‘अभिषेक जय हिंद’ हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. ‘रूम ऑन अ ट्री’ आणि ‘कॉलेज’ हे त्यांचे कथासंग्रहही वाचकप्रिय आहेत. ‘नौकर की कमीज’, ‘इफ इट ब्लूम्स वी विल सी’ आणि ‘देअर युज्ड टू बी अ विंडो इन द वॉल’ त्यांच्या कादंबऱ्या हिंदी साहित्यातील सर्वोत्तम समजल्या जातात. दिग्दर्शक मणी कौल यांनी त्यांच्या ‘नौकर की कमीज’ या कादंबरीवर चित्रपटही बनवला होता.

विनोदकुमार शुक्ल यांना कविता तसेच कादंबरी लेखनासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘देअर युज्ड टू बी अ विंडो इन द वॉल’ या कादंबरीसाठी त्यांना 1999 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता.