जर तुम्ही नवीन 7 सीटर फॅमिली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Renault Triber वर एक जबरदस्त ऑफर सुरु आहे. जानेवारी महिन्यात कंपनी या कारवर 55,000 रुपयांची सूट देत आहे. पण ही ऑफर 2024 सालच्या मॉडेलवर आहे. या सूटमध्ये 30,000 रुपयांची रोख सवलत, 15,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 10,000 रुपयांचा लॉयल्टी बेनिफिट उपलब्ध आहे. या ऑफरबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही Renault डीलरशीपशी संपर्क साधू शकता. Triber ची किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…
इंजिन आणि मायलेज
Renault Triber मध्ये 999cc पेट्रोल इंजिन आहे, जे 72 PS पॉवर आणि 96 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन, 5-स्पीड एएमटीशी जोडलेले आहे. ही कार मॅन्युअलमध्ये 17.65 kmpl आणि ऑटोमॅटिकमध्ये 14.83 kmpl मायलेज देते, असं कंपनीचं म्हणणं आहे.
Renault Triber मध्ये 5+2 सीटिंग पर्याय उपलब्ध आहे. या कारमध्ये 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. जी Apple कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोशी कनेक्ट होऊ शकते. ट्रायबरमध्ये चांगली स्पेस मिळते, यात5 प्रौढ आणि मागे 2 लहान मुले बसू शकतात.